Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2024 : कामगारांना मिळणार सरकारकडून ₹5000 रुपयाची मदत! अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज

Rate this post

Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2024 : महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे महाराष्ट्रातील लोकांच्या हितासाठी बऱ्याच योजना सुरू करण्यात आलेल्या आहे व या योजनेचा फायदा महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच गरीब परिवारांना मिळालेला आहे पण महाराष्ट्रामध्ये अजूनही काही असे गरीब व गरजू परिवार आहेत ज्यांना आतापर्यंत महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या योजनेचा लाभ मिळालेला नाही | व दिवसन दिवस अशा गरीब आणि गरजू परिवाराची आर्थिक स्थिती ही घसरत चाललेली आहे अशा परिवारातील लोकांना त्यांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठमोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे |

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

त्यामुळे महाराष्ट्र सरकार द्वारे अशा परिवारांच्या हितासाठी व त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे नाव Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2024 ठेवण्यात आलेले आहेत |

या योजने अंतर्गत सरकार बांधकार कामगार वर्गातील लोकांना त्यांच्या आर्थिक जीवनामध्ये सुधार करण्यासाठी ₹2000 रुपये ते ₹5000 रुपयाची आर्थिक मदत करणार आहे महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा फायदा घेण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल| आता या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसे भरावे ? कोणकोणती कागदपत्रे द्यावे लागतील ? या योजनेची पात्रता काय आहे ? या सगळ्याबद्दल माहिती आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही तर चला सुरू करण्यात आजच्या लेखाला |

Table of Contents

Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2024

Maharashtra Bandhkam Kamgar Yojana

योजनेचे नाव :Bandhkam Kamgar Yojana 2024
कोणी सुरु केली :ही योजना महाराष्ट्र शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे.
योजनेचे उद्दिष्ट :महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देणे
विभाग :महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ
फायदा :५,०००/- रु.
लाभार्थी :महाराष्ट्रातील बांधकाम कामगार
राज्य :महाराष्ट्र
अर्जाची प्रक्रिया :ऑनलाईन/ ऑफलाइन
अधिकृत वेबसाईट :https://mahabocw.in

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना काय आहे

महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे महाराष्ट्रातील बांधकाम कामगार वर्गातील लोकांसाठी Bandhkam Kamgar Yojana सुरू करण्यात आलेली आहे या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील बांधकार कामगारांना सरकारकडून दर महिन्याला ₹2000 रुपयांपासून ₹5000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे |

सरकारकडून ही आर्थिक मदत फक्त अशा बांधकाम कामगार वर्गातील लोकांच्या परिवारांना केली जाईल ज्यांना आपल्या कुटुंबाच्या उदाहरणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावे लागत आहे जवळपास महाराष्ट्रातील 12 लाख बांधकार कामगार परिवारांना या योजनेचा लाभ देण्याचे सरकारचे उद्दिष्टे आहे |

या योजनेमध्ये कामगारांना अर्ज करण्यामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून सरकारने बांधकाम कामगार कल्याण मंडळ या नावाने एक अधिकारी पोर्टल सुद्धा सुरू केलेले आहे तसेच ज्या बांधकामगार परिवारांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही अशा परिवारासाठी ऑफलाइन अर्जाची सोयी सुद्धा केलेली आहे |

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना चे उद्देश काय आहे

महाराष्ट्र राज्यातील बांधकाम करणारे कामगार जे आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी कठीण परिस्थितींना सामोरे जातात अशा गरीब आणि गरजू परिवारांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने बांधकाम कामगार योजना ची सुरुवात केलेली आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील बांधकाम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत देऊन त्यांचे आर्थिक स्थिती सुधारणे हा आहे |

या योजने अंतर्गत बांधकाम करणाऱ्या कामगारांना सरकारकडून दोन 2000 रुपयापासून 5000 रुपये पर्यंत ची आर्थिक मदत केली जात आहे यासाठी फक्त महाराष्ट्रातील कामगारांना योजनेच्या अधिकारी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे |

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजने चे लाभ

  • या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील सर्व बांधकाम करणाऱ्या कामगारांना देण्यात येईल |
  • या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्रातील बांधकाम करणाऱ्या कामगारांना 2000 रुपयांपासून 5000 रुपये ची आर्थिक मदत दर महिन्याला मिळेल |
  • या योजनेचे लाभार्थी असलेले कामगारांच्या खात्यामध्ये सरकार डायरेक्ट बेनिफिशरी मोड द्वारे पैसे जमा करेल |
  • या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील कामगाराच्या राहणीमानामध्ये सुधार करणे हा आहे |

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेमध्ये अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील बांधकाम करणाऱ्या कामगारांना काही पात्रतांना सामोरे जावे लागणार आहेत त्या खालील प्रमाणे दिलेले आहेत –

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे |
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या कामगाराचे वय हे 18 वर्षे ते 60 वर्षाच्या आत असायला हवेत |
  • तसेच कामगारांनी किमान 90 दिवस काम केलेले असणे गरजेचे आहे |

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र बांधकार कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांकडे काही जरूरी कागदपत्रे असणे आवश्यक आहे सर्व कागदपत्रांची यादी आम्ही खाली दिलेली आहे |

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • मोबाईल नंबर
  • रेशन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • वयाचे प्रमाणपत्र
  • ओळख प्रमाणपत्र
  • ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरावे

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा उपयोग करा आम्ही खाली तुम्हाला सगळी प्रोसेस डिटेल मध्ये समजून सांगितलेली आहे या प्रोसेस चा उपयोग करून तुम्ही बांधकाम कामगार योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा फायदा घेऊ शकता

  • सगळ्यात आधी तुम्ही या योजनेच्या अधिकारी वेबसाईटवर जावा त्यासाठी या ठिकाणी सुद्धा क्लिक करू शकता|
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अधिकारी पोर्टल येईल |
  • आता तुम्हाला या ठिकाणी कामगार हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करायचा |
  • कामगार या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून काही ऑप्शन दिले जातील त्यापैकी कामगार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा |
  • आता तुमच्यासमोर अजून एक नवीन पेज उघडून येईल |
  • या ठिकाणी तुम्हाला तुमची पात्रता तपासण्यासाठी काही माहिती विचारली जाईल ती न चुकता भरा |
  • आणि तुमची पात्रता तपासा या बटनवर क्लिक करा |
  • तुमची पात्रता तपासल्यानंतर तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म येईल |
  • या फॉर्ममध्ये विचारलेली सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे |
  • त्यानंतर सगळी कागदपत्रे अपलोड करायची आहे |
  • आता शेवटी सगळी माहिती भरून कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करा |

अशाप्रकारे तुम्ही महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता |

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेसाठी ऑफलाईन अर्ज कसे करावे

महाराष्ट्रातील ज्या बांधकाम करणाऱ्या कामगारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे शक्य होत नाही अशांसाठी महाराष्ट्र सरकारने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे या योजनेमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सगळी प्रोसेस आम्ही खाली सांगितलेली आहे |

  • सगळ्यात आधी तुम्हाला mahabocw च्या अधिकारी वेबसाईट https://mahabocw.in/ वर जाऊन या योजनेमध्ये अर्ज करण्याचा फॉर्म डाउनलोड करायचा आहे |
  • तुम्ही हा फॉर्म आमच्या टेलिग्राम चैनल वरून सुद्धा डाऊनलोड करू शकता त्यासाठी आमचा Marathi Yojana Help टेलिग्राम चॅनल चेक करा |
  • फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर तो प्रिंट करून घ्या व नंतर फॉर्ममध्ये विचारलेली सगळी माहिती भरून त्यासोबत लागणारे आवश्यक डॉक्युमेंट जोडा |
  • आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर फॉर्म ला महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ विभागा मध्ये जमा करा |
  • अशाप्रकारे तुम्ही या योजनेमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता |

Maharashtra Bandhkam Kamgar Yojana Form pdf Download

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना हेल्पलाइन नंबर

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेबद्दल जर कुठल्याही कामगाराला काही प्रश्न असेल तर ते या योजनेद्वारे जारी केलेल्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून विचारू शकतात हेल्पलाइन नंबर: 1800-233-4499

FAQ


महाराष्ट्रात कामगार योजनेसाठी कोण पात्र आहे?

या योजनेसाठी महाराष्ट्रातील सर्व बांधकाम करणारे कामगार पात्र आहेत तसेच ज्या कामगाराचे वयमान 18 ते 60 वर्षांच्या आत आहेत असे कामगार या योजनेमधून अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी किमान 90 दिवस काम केलेले गरजेचे आहे व कामगार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे

महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म pdf डाउनलोड

या योजनेचा नोंदणी फॉर्म तुम्ही अधिकारी पोर्टलवर जाऊन डाउनलोड करू शकता नाहीतर आमच्या टेलिग्राम वर सुद्धा तुम्हाला हा फॉर्म मिळू शकतो त्यासाठी Marathi Yojana Help टेलिग्राम चायनल चेक करा |

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना काय आहे

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे जी महाराष्ट्रातील बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेनुसार महाराष्ट्रातील बांधकाम करणाऱ्या कामगारांना सरकारकडून दर महिन्याला दोन हजार रुपये ते पाच हजार रुपये याची आर्थिक मदत केली जाणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे |

MM Yojana Home Page Click Here
Telegram Channel Link Click Here
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

1 thought on “Maharashtra Bandhkam Kamgar Yojana 2024 : कामगारांना मिळणार सरकारकडून ₹5000 रुपयाची मदत! अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज”

Leave a Comment